random

Other Collections:स्वप्नांचे ही ओझे होते…

म्हणूनच म्हणतो मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते… रात्रीचा दिवस केला, प्रयत्नांची केली पराकाष्ठा. तरी नाही पूर्ण झाली मनीची इच्छा सारे काही संपले आता असे मनाला ठाम वाटते म्हणूनच म्हणते मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते… वेड्या मनाला सवय आहे स्वप्नांच्या मागे धावण्याची काळा बरोबर मागे राहण्याऱ्या अपुऱ्या स्वप्नांच्या यातनांची आपलेच मन आता आपले शत्रू वाटू लागते म्हणूनच म्हणते मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते… जेव्हा जातात सत्याच्या प्रकाशात सारी स्वप्ने विरून तेव्हा येई जवळी दुखाचे सावट दुरून प्रत्येक स्वप्न मग डोळ्यातले अश्रू बनते म्हणूनच म्हणते मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते… ह्या स्वप्नांचे रंग तरी किती प्रेम, मैत्री, सम्मान आणि कीर्ती त्याच स्वप्नांच्या अपुऱ्या राहण्याने जीवन सारे बेरंग होते म्हणूनच म्हणते मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते… स्वप्नांची पूर्तता ठरवते जीवनातील सुख-दुखाची बेरीज-वजाबाकी ह्याच सुखांची हुलकावणी आणते कधी अवचित डोळा पाणी सुख मिळावे अधिक, दुखं व्हावी उणी असे प्रत्येकालाच वाटते पण जीवनाचे गणित एवढे सोपे कधीच नसते म्हणूनच म्हणते ...(Read More)